पुणे जिल्हा : खेडमधील मुली हुश्शार…!

तालुक्याचा निकाल 93.59 टक्के : चार शाळा 100 नंबरी
राजगुरूनगर – महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ (बारावी) खेड तालुक्याचा निकाल 93. 59 टक्के इतका लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. तालुक्यात यावर्षी केवळ 4 शाळांचे निकाल 100 टक्के लागले आहेत.
खेड तालुक्यातील बारावीच्या परीक्षेस 33 कनिष्ठ महाविद्यालयातील 5 हजार 232 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 4 हजार 897 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 96.94 टक्के विद्यार्थिनी तर 90. 55 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत. तालुक्यात सर्वाधिक कमी निकाल बहूळ येथील सुभाष माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 62. 06 टक्के लागला आहे.
खेड तालुक्यातील शाळांचा निकाल (टक्केवारी) ; हुतात्मा राजगुरु महाविद्यालय, राजगुरूनगर (93.27), कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनियर कॉलेज, वाडा (94. 69), सिताबाई पाटोळे ज्युनियर कॉलेज, चाकण (97. 59), संत ज्ञानेश्वर विद्यालय ज्युनियर कॉलेज, आळंदी (94.47), म. फ. गायकवाड विद्यालय ज्युनियर कॉलेज, दावडी (85. 71), सुभाष माध्यमिक विद्यालय व जुनियर कॉलेज, बहुळ (62. 06), रामभाऊ म्हाळगी विद्यालय ज्युनियर कॉलेज कडूस (64. 70),
सुमंत उच्चमाध्यमिक विद्यालय,पिंपरी बुद्रुक (66. 66), नविन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मरकळ (96. 23), शिवाजी विद्यालय, डेहणे (81. 91), रामचंद्र पाटील औटी उच्च माध्यमिक विद्यालय, आळंदी (70. 90), आर्टस, कॉमर्स ज्युनिअर कॉलेज, पाईट (90.69), महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज, राजगुरूनगर (100), नवचैतन्य उच्च माध्यमिक विद्यालय, काळूस (85. 33), श्री भामचंद्र विद्यालय,भांबोली (97. 43), पी. के. कॉलेज कडाचीवाडी, चाकण (94. 59), उच्च माध्यमिक विद्यालय, वाशेरे (88. 46), नवमेश विद्यालय, चाकण (68), श्री समर्थ माध्यमिक विद्यालय, चिंबळी (99.42),
बीएम पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बिरदवडी (87.50), आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज, डेहणे (82.72), आर्ट्स कॉमर्स कॉलेज, राजगुरूनगर (98.19), श्री समर्थ ज्युनिअर कॉलेज, नाणेकरवाडी (99. 70), ज्ञानवर्धिनी ज्युनियर कॉलेज, खेड (93.50), मॉडर्न हायस्कूल व जुनियर कॉलेज, भोसे (100), प्रियदर्शनी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज वाकी (100), श्री शिवाजी विद्यालय व ज्युनियर कॉलेज शेलपिंपळगाव (89. 36),
डायनॅमिक इंग्लिश मेडीयम व ज्युनियर कॉलेज, कडूस (100), होली अँगल स्कूल व जुनियर कॉलेज चाकण (96.72), गव्हर्नमेंट आयटीआय खेड (87.87), आदिराज प्राव्हेट आयटीआय खेड (75), हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, राजगुरुनगर (90. 47), शिवाजी विद्यामंदिर व सीताबाई भिकोब शेठ जुनिअर कॉलेज, चाकण(98.61).





