पुणे जिल्हा : लडकत सायन्स अकॅडमीची उज्वलपरंपरा कायम

12 वी विज्ञान परीक्षेत 100 टक्के निकाल
बारामती – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये येथील लडकत सायन्स ॲकॅडमीचा विज्ञान शाखेचा एकूण 100 टक्के निकाल लागला आहे. अकॅडमीने मागील 8 वर्षापासून बारामतीच्या शैक्षणिक विकासामध्ये भर घालण्याचे कार्य केले आहे.
फेब्रुवारी/ मार्च २०२४ च्या बोर्ड परीक्षेच्या निकालात घवघवीत यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेतून प्रथम प्रियंका जाधव (90.17 %), द्वितीय- सृष्टी जाधव (89.00 %), तृतीय प्रिन्सी दुबे (87.83%), ऋतुजा पुणेकर (87.83%) तसेच 100 पेक्षा जास्त विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झालेले आहेत.
लडकत सायन्स अकॅडमीमध्ये मेडीकल इंजिनीअरिंग साठीच्या पूर्व परीक्षा IIT-JEE/NEET/MHTCET साठी तयारी करून घेतली जाते. शेकडो विद्यार्थी आतापर्यंत अकॅडमी मध्ये शिक्षण घेऊन मेडीकल व इंजिनिअरिंग क्षेत्रात चमकत आहेत.
IIT -JEE व NEET साठी स्वतंत्र इमारत, स्वतंत्र स्टाफ असणारी बारामतीमधील एकमेव अकॅडमी, मुलामुलींच्या स्वतंत्र बॅचेस तसेच बाहेर गावच्या विद्यार्थांसाठी सुरक्षित हॉस्टेल व मेस सुविधा आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संचालक नामदेव लडकत, गणेश लडकत, अकादमीचे प्राचार्य प्रा. रामचंद्र वाघ, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.





