पिरंगुट : ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने पिरंगुट ओढ्यावरील पुलाचे रेंगाळले आहे. येत्या पंधरा दिवसात ओढ्यावर असलेल्या पुलाचे प्रलंबित काम तात्काळ पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. खासदार सुप्रिया सुळे यांनी पिरंगुट ओढ्यावरील पुलाची शनिवार, दि.७ रोजी सकाळी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी पुलाच्या कामाबाबत चर्चा करत प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करायची सूचना केली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सविता दगडे, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व माजी सभापती महादेव कोंढरे, माजी सभापती कोमल वाशिवले, महिला अध्यक्षा दिपाली कोकरे, युवती अध्यक्षा गौरी भरतवंश, बाजार समितीचे माजी उपसभापती दगडूकाका करंजावणे, माजी सरपंच रामभाऊ निकटे, युवक अध्यक्ष समीर बुचडे, युवक कार्याध्यक्ष राहुल पवळे, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विलास अमराळे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष धोंडिबा केदारी, अनिल पवार आदी उपस्थित होते.