पुणे जिल्हा : लाडकी बहिणचा फॉर्म भरून मिळणार गावागावात

अमित झेंडे युथ फाउंडेशनचा अभिनव उपक्रम
वाघापूर – नुकतीच महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. कागदपत्रांच्या जुळवाजुळीसाठी महिलांची धांदल उडाली. त्याच पार्श्वभूमीवर माझ्या बहिणीला तालुक्याच्या ठिकाणी येण्याजाण्याचा त्रास होऊ नये, फॉर्म भरण्यास उशीर होऊन मानसिक त्रास होऊ नये यासाठी अमित झेंडे युवा फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गावागावात जाऊन महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याचा कॅम्प आयोजित करण्यात येत आहे.
हा फाॅर्म भरण्याचा संपूर्ण खर्च अमित झेंडे युथ फाउंडेशन करणार आहे. आतापर्यंत दिवे, सोनोरी, झेंडेवाडी वाघापूर, आंबळे, टेकवडी, चांबळी, हिवरे या गावातील महिलांचे फॉर्म भरण्याचे काम चालू आहे. नुकताच अमित झेंडे युथ फाउंडेशनच्या वतीने आंबळे गावात हा कॅम्प घेण्यात आला. यासाठी महिलांचा प्रचंड प्रतिसाद होता. आंबळे गावातील कॅम्पचे नियोजन सुमित जगताप, आकाश शेंबडे, दत्ता शेंबडे, पंकज जगताप, दरेकर यांनी केले.
फाऊंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत पुरंदर तालुक्यातील आठ गावांतील महिलांचा योजनेचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे. गावांच्या मागणीनुसार हा कॅम्प पूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार आहे:
– अमित झेंडे, अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पुरंदर.





