लोणी काळभोर : येथील इंग्लिश मीडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने सलग सहा वर्षे 100 टक्के निकाल लावण्याची परंपरा जपली आहे. संस्कार कोरे याने 97 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला, अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्या पौर्णिमा शेवाळे यांनी दिली. दहावीच्या परीक्षेसाठी विद्यालयाचे 85 विद्यार्थी बसले होते. अनुजा नंदकुमार साळुंखे हिने (92.60) द्वितीय तर सिद्धी ओमप्रकाश शर्मा व ओम अमोल कन्हेरे या दोन्ही विद्यार्थ्यांनी (प्रत्येकी 92) तृतीय क्रमांक मिळवला आहे. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सहसचिव (प्रशासन) सीताराम गवळी यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या पौर्णिमा शेवाळे, सुलताना इनामदार, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.