Pune District : टेम्पो थेट द्राक्ष बागेत शिरला

काटेवाडी : श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा अंदाज न आल्याने लिमटेक (ता. बारामती) या ठिकाणी पाटसवरून श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाने निघालेला टेम्पो रस्ता सोडून सरळ द्राक्ष बागेत. यात द्राक्ष बागेसह टेम्पोचे नुकसान झाले आहे.
पाटसवरून बारामतीकडे येणार्या श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरून रात्री अकराच्या नंतर टेम्पो येत असताना लिमटेक या ठिकाणी रस्त्याचा अंदाज न आल्याने टेम्पोने वळण न घेता रस्त्यालगत असलेल्या गटर लाइनवरून द्राक्ष बागेमध्ये गेल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र द्राक्ष बागेची दहा ते पंधरा झाडे तुटून पडले असून टेम्पोचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यात टेम्पो द्राक्ष बागांच्या झाडांना अडकल्याने जीवित हानी झाली नाही. वाहन चालकांनी रात्रीच्या वेळी कायम दक्षता घेऊन वाहन चालवणे गरजेचे आहे रस्त्यावरती पुढे वळणाच्या वेळी बाण दाखवला आहे का नाही पुढे रस्ता संपला आहे की वळण याकडे लक्ष देणे वाहनचालकाचे गरजेचे आहे.
असे वाहन चालक लक्ष देत नसल्याने अशा प्रकारे मोठे अपघात होऊन यामध्ये एखाद्याचा जीव जाण्याचाही शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे वाहन चालकांनी काळजीपूर्वक पान चालवणे गरजेचे आहे.





