पुणे जिल्हा : ‘आपला माणूस’ म्हणून माऊली कटके यांना तरुणांचा पाठिंबा

शिरूर – शिरूर-हवेली विधानसभा निवडणुकीत एक नवा रंग आणि जोश दिसू लागला आहे. या वेळी पक्ष, प्रचारधोरणे किंवा साधारण राजकीय समीकरणं बाजूला ठेवून, मतदार आपला माणूस शोधत आहेत.
या बदलत्या संकल्पनेचं केंद्रस्थान आहे माऊली आबा कटके! ‘आपला माणूस’ म्हणून ओळखल्या जाणार्या माऊली कटके यांच्याभोवती तरुणाई, महिलावर्ग आणि सर्वसामान्य जनता एकजूट झाली आहे. त्यांच्या साधेपणातून आणि जनसंपर्काच्या खास शैलीतून ज्ञानेश्वर उर्फ माऊली (आबा) कटके यांनी या मतदारसंघाच्या हृदयात विशेष स्थान मिळवलेलं त्यांच्या प्रचारातून आहे.
माऊली कटके यांनी ज्या प्रकारे सामाजिक नाळ सामान्य जनतेशी घट्ट जोडली, त्यातून लोकांना ते सहज उपलब्ध होत आहेत. कटके यांच्या साध्या वागण्या-बोलण्याने, सहजपणे लोकांमध्ये मिसळण्याच्या पद्धतीमुळे जनतेला ते खर्या अर्थाने आपलेसे वाटू लागले आहेत. राजकीय पायरीवरून वर चढताना त्यांनी नेहमीच गावखेड्यातील लोकांच्या गरजा समजून घेतल्या, त्यांना आधार दिला, आणि हेच जनतेला माऊलींची खरी ओळख पटवून देत आहे.
माऊली कटके यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रचारामुळे, शिरूर मतदारसंघात एक नवा उत्साह निर्माण झाला आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणारा तरुण वर्ग, महिलावर्ग, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पाठीशी उभे आहेत. निवडणुकीचा अंतिम निकाल काय असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल, पण सध्या शिरूर मतदारसंघात माऊली कटके यांच्या नावानेच एक नवा विश्वास दिसतो आहे.
युवा वर्गाची साथ
आमच्यातला, आपला माणूस आमदार बनणार! या विश्वासाने तरुणाई आनंदात आहे तर महिला भगिनी देवाला प्रार्थना करत आहे. कटके यांच्या साध्या राहणीमानात तरुणाईला त्यांच्या आयुष्यातल्या संघर्षांची झलक दिसते. त्यामुळेच कटके हे त्यांच्या मनात जागा निर्माण करून आहेत. त्यांच्याबरोबर उभे राहून युवा वर्गाने कटके यांना विधानसभेपर्यंत पोहोचवण्याचं ध्येय मनाशी ठाम केलं आहे.
लाडकी बहीण प्रचारात
महायुती सरकारच्या योजना लोाकंपर्यत पोहोचवणे यामध्ये माऊली कटके अग्रेसर दिसतात. लाडकी बहीण योजना, एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, मुलींना उच्चशिक्षण मोफत, तीन सिलेंडर मोफत देण्याचे आश्वासन या योजना महिलांसाठी किती चांगल्या आहेत हे पटल्याने लाडकी बहीण माऊली कटके यांच्या प्रचारात सहभागी झालेली दिसत आहे. याशिवाय कटके यांनी महिला सक्षमीकरण, सामाजिक सुरक्षा आणि जनसंपर्कातून महिलांच्या प्रश्नांवर लक्ष दिलं आहे, आणि त्यामुळे त्यांच्या या कृतीशील नेतृत्वाला महिला मतदारांचे विश्वासार्ह पाठबळ मिळतंय.





