Pune District : भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करा
Updated On:

राजगुरुनगर – शहरात दिवसेंदिवस भटक्या व मोकाट कुत्र्यांचा प्रचंड सुळसुळाट होत असून, त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी अॅड. दिपक रामदास थिगळे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे.
भटक्या कुत्र्यांच्या धावपळीमुळे लहानमोठे अपघात घडत असून, लहान मुलांना चावल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून, शहरात दुर्गंधी पसरल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत, असे थिगळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने तातडीने भटक्या कुत्र्यांचे लसीकरण व निर्बीजीकरण करून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्याधिकारी गर्कळ यांना निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते तेजस घुमटकर व हनुमंत फदाले उपस्थित होते.





