पुणे जिल्हा : आमदार मोहितेंच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

राजगुरूनगरात जोरदार प्रचार : महिलांकडून औक्षण करून स्वागत
राजगुरूनगर – शहरातील वाडा रस्ता, समतानगर आदी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, आरपीआय मित्र पक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला.
प्रचार रॅलीत महायुतीचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील, भाजपचे प्रदेश सदस्य राम गावडे,जिल्हा परिषद माजी अध्यक्ष निर्मला पानसरे, तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, भाजपचे गणेश सांडभोर, राजगुरूनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष गणेश थिगळे, माजी संचालिका हेमलता टाकळकर, युवक अध्यक्ष वैभव घुमटकर, भाजप तालुका उपाध्यक्ष दत्ता सांडभोर,शहर अध्यक्ष सुभाष होले, युवक शहर अध्यक्ष सागर सातकर, कल्पना सांडभोर, नितीन गुरव, अॅड. मनीषा टाकळकर, अॅड. अर्चना किर्लोस्कर, मीनाक्षी भांगे, अजित लूनावत, प्रतीक मोहिते, वैभव नाईकरे, नानजिंग शेख, संतोष भांगे यांह्यासह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक महिला प्रचार रॅलीत सहभागी झाले होते.
शहरातील माता-भगिनींनी आमदार दिलीप मोहिते यांच्या औक्षण करून त्यांचे स्वागत केले. नागरिकांनी प्रत्येक सोसायटीत, प्रत्येक छोट्या-मोठ्या रस्त्यांचे झालेला विकास या प्रती समाधान व्यक्त केले. प्रामुख्याने वाडा रस्त्याचे काम झाल्यामुळे ट्रॅफिकची समस्या तसेच पायी चालणार्या लोकांची होणारी अडचण दूर झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे त्यामुळे नागरिकांनी या रॅलीत सहभाग घेत स्वागत केले.
महायुती सरकारच्या अनेक योजना आज सुरू आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक माता भगिनींना होत असून आज बर्याच ठिकाणी स्वतःचे छोटे-मोठे व्यवसाय माता-भगिनी करताना दिसून येत आहेत . येणार्या काळात दिलीप अण्णा मोहिते यांनाच निवडून देण्याचा निश्चय शहरातील महिला आणि ग्रामस्थानी केला आहे.
– वैभव घुमटकर, युवक अध्यक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस, खेड तालुका





