पुणे जिल्हा : चुकुन शब्द बोललो अन् लागली वाट – अजित पवार

सुपे येथे पाणीटंचाई बैठकीत जोरदार बॅटिंग
जळोची : मागे एकदा असेच पाणी द्या पाणी द्या.. म्हणत चुकून एक शब्द बोलला गेला.. पार वाट लागली वाट.. कोठे दादा सापडतोय… कुठला शब्द कुठे सापडतोय याकडेच माध्यमांचे लक्ष असते, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार बॅटिंग केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (दि. 20) बारामती दौर्यावर आहेत. सुपे येथे पाणीटंचाई बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत एक जणाने उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे कायमस्वरूपी पाणी द्या अशी चिठ्ठी दिली यावेळी पवार यांनी त्यांच्या स्टाइलने जोरदार फटकेबाजी केली.
यावेळी पवार यांनी कोणत्या गावासाठी किती निधी उपलब्ध करून दिला आहे याची यादी वाचून दाखवत होते. याचवेळी गावकरी उभा राहिला आणि म्हणाला की, दादा पाणी योजनेत माझ्या गावाचे नावच नाही.
अरे बाबा तुझ्या गावाचे नाव आहे. असे म्हणत त्यांनी पुन्हा यादी वाचून दाखविली. यादी वाचून दाखवताच त्या नागरिकाच्या गावाचा उल्लेख होताच तो नागरिक सॉरी सॉरी म्हणत खाली बसला. त्यावर हजर जबाबी पणा असणार्या अजित पवारांनी.. तू माझी प्यारी प्यारी… म्हणत उत्तर दिले आणि यावेळी एकच अशा पिकला..
288 आमदारांमध्ये मी…
राज्यातील 288 आमदारांमध्ये सर्वात जास्त काम मी करतो. सुपा परिसरातील जिरायती भागात 653 कोटींची कामे झाली आहेत. त्यातील काही सुरू आहेत. काहीजणांनी सांगितले मुंबईला बोलावले काही मुंबईच्या हातात नाही सर्व या हातात आहे. असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली.





