पुणे जिल्हा : सोपानकाकांच्या पालखीचे भवानीनगरमध्ये स्वागत
Updated On:

भवानीनगर : श्री संत सोपानकाका महाराज पालखीचे भवानीनगर येथे दुपारी तीन वाजता आगमन झाले.
श्री छत्रपती साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय सपकळ, राजेंद्र गावडे, निवृत्ती सोनवणे, हेमंत निंबाळकर, अमोल भोईटे, बी. के. सपकळ, किरण गायकवाड, संतोष चव्हाण, सेक्रेटरी अनिल काटे, सुहास निंबाळकर, तानाजी खराडे, संजय मुळीक आदींच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
महागणपती व्यापार पेठ व तरुण मंडळ यांनी एकत्र येऊन महागणपती व्यापार पेठ चौकामध्ये पालखीतील वारकऱ्यांना भोजन दिले.
महागणपती व्यापार पेठचे अध्यक्ष जगदीश पडवळ, दिलीप तुपे, दिलीप निंबाळकर, दीपक नेवसे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पालखीची व्यवस्था केली.





