पिरंगुट : बदलापूर येथील अत्याचार प्रकरणी पिरंगुट (ता. मुळशी) येथे महिलांनी मूक पदयात्रा काढत निषेध केला. यावेळी अनेक महिलांनी या हृदयद्रावक घटनेचा कडवा निषेध आपल्या भाषणातून व्यक्त केला. पिरंगुटचे माजी उपसरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्याध्यक्ष राहुल पवळे यांनी ही या प्रकरनाचा निषेध आपल्या भाषणातून व्यक्त केला. पिरंगुट महिला मंडळांकडून बदलापूर येथील झालेल्या बलात्कार प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि न्यायासाठी एकजूट दाखवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी या महिलांनी व ग्रामस्थांनी केली.