पुणे जिल्हा : शरद पवारांचे सुर बदलले!

बारामती : बारामती विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार बारामतीच्या दौर्यावर आहेत. युगेंद्र पवार यांच्यासाठी त्यांनी सभांचा धडाका लावला आहे, असे असले तरी त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी अजित पवार यांचे बाबतचे सूर बदलल्याचे दिसून येत आहे.
मागील आठवड्यात अजित पवार यांच्या रडण्याची नक्कल सुरुवातीच्या भाषणात केल्यानंतर अजित पवार यांच्या बाबत तक्रार नसल्याचे मंगळवारी (दि. 5) शरद पवार यांनी नमूद केले आहे.
अजित पवार रडत असल्याची नक्कल शरद पवार यांनी केली. त्यानंतर त्याचे पडसाद तालुक्यात उमटले. अजित पवार यांनी देखील मी शरद पवारांना दैवत मानतो त्यांनी अशी नक्कल करणे याच मला वाईट वाटते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर बारामती तालुक्यात याबाबत चर्चेला उधान आले होते.
अशा प्रकारचे नकलेले अजित पवार यांना सहानुभूती मिळत असल्याचे लक्षात येताच शरद पवार यांनी मंगळवारी बारामतीत अजित पवारांबाबत तक्रार नसल्याचे जाहीर केले. तसेच गेले 33 वर्षे अजित पवार बारामती काम करत आहेत; मात्र नवीन नेतृत्व घडवायचे असल्याचे सूचक विधान पवारांनी केले.





