वाघोली : वाघोली हवेली मंडलाधिकारी कार्यालय अंतर्गत केसनंद येथील तळेरानवाडीसाठी स्वतंत्र तलाठी कार्यालय कार्यान्वित झाले असून ग्रामपंचायत पदाधिकार्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे.

सातत्याने ग्रामपंचायत केसनंद यांचे माध्यमातून शासन दरबारी केसनंद आणि तळेरानवाडी या दोन महसुली गावांच्या स्वतंत्र तलाठी कार्यालय मागणीसाठी पाठपुरावा केला जात होता, त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या शासन आपले दारी या योजनेअंतर्गत केसनंद गावासाठी स्वतंत्र तलाठी कार्यालय व भाऊसाहेबांची नियुक्ती करण्यात आली.

त्यानिमित्ताने नवनियुक्त तलाठी वाबळे यांचा ग्रामपंचायत केसनंद व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या नियुक्तीने शेतकरी बांधव, सर्वसामान्य नागरिकांना महसुली कामकाजासाठी वाघोली तलाठी कार्यालय या ठिकाणी जाण्यासाठी चा वेळ वाचणार आहे. महसूल संदर्भात विविध दाखले लवकरात लवकर उपलब्ध करून दिले जातील व पुढील 15 दिवसांमध्ये शासकीय दप्तरांची पडताळणी करून केसनंद ग्रामपंचायत शेजारी नवीन कार्यालय सुरू केले जाईल असे भाऊसाहेब यांनी दिले आहे.

नवनियुक्त तलाठ्यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला यावेळी बाबासाहेब हरगुडे, संतोष पांडुरंग हरगुडे, प्रदीप ढवळे भाऊसाहेब, पतंगे भाऊसाहेब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.