पुणे जिल्हा : मंचर येथे सर्वरोग निदान शिबिराला प्रतिसाद

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
आरक्षणाच्या भूमिकेला पाठिंबा देत अनेक कार्यक्रम रद्द
मंचर – सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंचर (ता. आंबेगाव) येथील उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या सर्व रोग निदान शिबिरामध्ये गरीब, गरजू रुग्णांनी सहभाग घेऊन उत्तम प्रतिसाद दिला.
सहकारमंत्री वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते; परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण भूमिकेला पाठिंबा देत राष्ट्रवादीने जाहीर केलेले अनेक कार्यक्रम रद्द करून आधी जाहीर केलेले आरोग्य शिबिर रुग्णाच्या आग्रहास्तव मंचर उपजिल्हा रुग्णालयात घेण्यात आले. यावेळी खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, पारनेर येथील रुग्ण वैद्यकीय तपासणीसाठी आले होते.
यावेळी शरद सहकारी बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, “भीमाशंकर’चे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शरद बॅंकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे पाटील, माजी सभापती संजय गवारी, उद्योजक मिलिंद खुडे, बाबाजी टेमगिरे, नंदा सोनावले, दत्ता थोरात, दादाभाऊ थोरात, विकास बाणखेले, संजय बाणखेले, सुहास बाणखेले, प्रवीण मोरडे, संतोष माशेरे, मारुती पाचपुते, विकास भोर उपस्थित होते. देवेंद्रशेठ शहा फाउंडेशनचे अध्यक्ष निळूभाऊ काळे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डी. के. वळसे पाटील, जगदीश घिसे, निळूभाऊ काळे यांनी शिबिराची व्यवस्था पाहिली.
मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक शिवाजीराव जाधव, डॉ. संजयकुमार भवारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णांची वैद्यकीय तपासणी केली. शिबिर यशस्वी होण्यासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर परिचारिका आणि त्याच्या सहकारी यांनी प्रयत्न केले.





