Pune District : घडलेल्या गुन्ह्याची पोलिसांना तात्काळ खबर द्यावी

मंचर : नागरिकांनी कायद्याचे पालन करावे. तसेच एखादा गुन्हा घडल्यास तात्काळ पोलिसांना त्याची खबर द्यावी. कायद्याचे पालन करून शांतता प्रस्थापित करावे. असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी केले. पारगाव पोलीस ठाण्याच्या वतीने भराडी (ता.आंबेगाव) येथे नवीन फौजदारी कायदे भारतीय न्याय संहिता २०२३ ,भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३, भारतीय साक्ष अधिनियम २०२३ बाबत कार्यक्रमाचा आयोजन केले होते.
यावेळी या नवीन फौजदारी कायद्याबाबत सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी माहिती दिली.यावेळी ॲड. अशोक पालेकर, ॲड. स्वप्नाली पालेकर,ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी, पोलीस पाटील उपस्थित होते. यावेळी ॲड. निलेश शेळके यांनी नवीन हे तिन्ही कायदे १/०७/ २०२४ पासून लागू झाले असून या कायद्यामधील महत्त्वाच्या तरतूदी, त्याच्यामध्ये दहशतवादाची व्याख्या, जमावाने कायदा हातात घेतल्यानंतर होणारी शिक्षा, या बाबत माहिती दिली. विशिष्ट अपराधासाठी समाजसेवेची शिक्षा यासारख्या तरतुदी समाविष्ट केले असल्याचे सांगितले.
एखाद्या पीडित व्यक्तीबाबत उपाययोजनाबद्दल कायद्यात समाविष्ट केलेल्या तरतुदीची माहिती दिली. दखलपात्र, अदखलपात्र गुन्हे तसेच झिरो एफ.आय.आर याबद्दल माहिती सांगून जुने व नवीन कायदे यामधील फरक समजून सांगितले. सूत्रसंचालन रमेश खिलारी यांनी केले.





