सोरतापवाडी –संत तुकाराम तुकाराम महाराज पालखी सोहळा कदमवाकवस्ती येथील मुक्काम आटोपून सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास यवतकडे (ता. दौंड) प्रस्थान केले. यावेळी कदमवाकवस्ती व लोणी काळभोरच्या ग्रामस्थांनी भक्तीभावाने सोहळ्यास निरोप दिला.
कुंजीरवाडी येथे आरोग्यदूत युवराज काकडे यांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून वारकर्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कुंजीरवाडी येथे मुस्लिम समाज व शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने वारकर्यांना पिठलं भाकरी व अनेक प्रकारच्या मिरची ठेच्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते स्वप्नील कुंजीर, मुस्लिम समाजाचे बाबूभाई शेख, अकील मेमन, भाऊसाहेब कुंजीर, दत्तात्रय कुंजीर, आप्पा कुंजीर उपस्थित होते.
नायगाव फाटा येथे सतिश जवळकर यांनी वारकर्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटल्या. श्री काळभैरवनाथ प्रसादिक दिंडीतर्फे पालखीचे स्वागत करण्यात आले. नायगाव ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरातील पंढरपूर येथील धर्म शाळेला देणगी देणार्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच अश्विनी चौधरी, माजी प्रभारी सरपंच राजेंद्र चौधरी, माजी सरपंच गणेश चौधरी, कृष्णा चौधरी, नितीन हगवणे, संतोष हगवणे आदी उपस्थित होते.
पेठ गावच्या वतीने यशवंत कारखान्याचे माजी संचालक रघुनाथ आण्णा चौधरी यांच्या वतीने वारकर्यांना गुडदाणीचे व चिवड्याचे पाकीटे वाटण्यात आले. तसेच युवा उद्योजकांनी अडीच हजार जेवणाची पाकिटे व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या. यावेळी सरपंच जयश्री चौधरी, रघुनाथ अण्णा चौधरी, आदर्श सरपंच सुरज चौधरी, पोलीस पाटील दत्तात्रय चौधरी, सोरतापवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य निलेश खटाटे, पेठगावचे युवा उद्योजक सुजित चौधरी, श्रीकांत चौधरी, सुनील चौधरी, सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.
सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने वारकर्यांना अन्नदान करण्यात आले. यावेळी भक्तांसाठी निवारा शेड हिरकणी कक्ष आरोग्य केंद्र स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती सरपंच स्नेहल चौधरी यांनी दिली. यावेळी उपसरपंच विजय चौधरी, माजी सरपंच व विदयमान ग्रामपंचायत सदस्या, संध्या चौधरी, सदस्य सनी चौधरी, ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड, उदयोजक अमित चौधरी, अविनाश मेमाणे आदी उपस्थित होते. सोरतापवाडी सेवाभावी संस्थेच्या वतीने वारकर्यांना दुध देण्यात आले. यावेळी भाऊसाहेब पंढरीनाथ चौधरी यांच्या वतीने पिठलं भाकरीचे जेवण देण्यात आले.
सुदर्शन चौधरी मित्र मंडळातर्फे वारकर्यांना रेनकोट, फरसाण, पाणी व केळीचे वाटप करण्यात आले. यावेळी हवेली बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी, सुहास चौधरी आदी उपस्थित होते. प्रयाग धाम फाटा येथे कोरेगाव मुळचे माजी सरपंच विठ्ठल शितोळे यांनी वारकर्यांच्या साठी चहा, बिस्किटे व केळीचे वाटप केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय काकडे, सदस्या मनिषा कड, पोलीस पाटील वर्षा कड, उदयोजक सचिन कड आदी उपस्थित होते. पुढे यवत मुक्कामासाठी पालखी मार्गस्थ झाली.