चिंबळी : शिव प्रतिष्ठान सल्गन नवमहाराष्ट्र मित्र मंडाळाच्या वतीने गणेशोत्सव निमित्त पैठणीचा खेळ रंगला. पैठणीच्या स्पर्धेत 60 महिलांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. उत्कृष्ट प्रतिसाद दिला असल्याने स्पर्धा पाहण्यासाठी ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्यने उपस्थित होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पल्लवी पिंगळे यांनी मिळवत पैठणीचा मान संपादन केला. तर व्दितीय क्रमांक मनिषा बहिरट तृतीय क्रं मनिषी बहिरट यांना मिस्कर व कुकर भेट देण्यात आला. या कार्यक्रमाचे बक्षिस वितरण सरपंच ज्योती जैद ग्राम पंचायत सदस्या संगित बनकर राजश्री जैद ज्योती जाधव आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मडाळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सचिव सर्व सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.