Pune District : महिला पत्रकारावरील हल्ल्याचा मंचर येथे निषेध
Updated On:

– विविध पत्रकार संघटनांकडून शहरात निदर्शने
मंचर – मंचर येथील पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे मान्यवर आणि पत्रकार संघटना मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवार, दि.१५ रोजी उपस्थित होते.उपस्थितांनी काळ्या फिती लावून हल्लेखोरांचा निषेध केला.
यावेळी स्नेहा बारवे यांच्यावर झालेल्या हल्लेखोरांतील काही लोकांना अटक झाली असून उर्वरित लोकांना अटक करावी,अशी मागणी सर्व मान्यवरांनी केली.
तसेच पत्रकार हल्ला कायद्याचा वापर करून पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांद्वारे संबंधितावर गुन्हे दाखल करावे, पत्रकार सुरक्षित नसल्याची भावना सर्वच मान्यवरांनी व्यक्त करत तीव्र निषेध केला. यावेळी मंचर प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार सचिन मुंडे यांना निवेदन देण्यात आले.





