पुणे जिल्हा : जयराज सहकारी पतसंस्थेला 26 लाखांचा नफा

सभासदांना 11 टक्के लाभांश ः कर्मचार्यांना 25 टक्के बोनस
अकलूज – माळशिरस तालुक्यातील आनंदनगर-अकलूज येथील जयराज सहकारी पतंस्थेला अहवाल सालात 26.25 लाख रुपये एवढा निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना 11 टक्के लाभांश तर कर्मचार्यांना 25 टक्के लाभांश संस्थेचे चेअरमन शशिकांत माने-पाटील यांचे हस्ते दिवाळी सणापूर्वी वाटप करण्यात आला.
जयराज सहकारी पतसंस्थेची राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली चेअरमन शशिकांत माने-पाटील यांनी आनंदनगर, अकलूज, बागेचीवाडी, चाकोरे, गिरझणी, कोंडबावी, वटफळी, संग्रामनगर, यशवंतनगर परीसरातील जनतेच्या उन्नतीसाठी स्थापन केली.
दरवर्षी गरजू, छोटे छोटे उद्योगधंदा करणारे, शेतकरी बांधवांना शेती अवजारे, घर बांधणे, मुलांच्या लग्नासाठी वेळोवेळी लाखो रुपयांचे कर्ज वाटप करण्यात येते असल्याचे संस्थेचे सचिव विजयकुमार भोसले यांनी सांगून संस्थेच्या प्रगतीचा आढावा सांगितला. संस्थेचे भागभांडवल 80 लाख एवढे असून संस्थेत सुमारे 1200 सभासद आहेत. दरवर्षी ऑडीट वर्ग अ असून अहवाल सालात सुमारे 26 लाख 25 हजारांचा नफा झालेला आहे. 11 टक्केप्रमाणे सभासदांना लाभांश वाटप करणेत आलेले आहेत.
तसेच चेअरमन शशिकांत माने-पाटील, व्हा. चेअरमन जनार्दन चव्हाण व संचालक जयराज माने-पाटील, सौरभ इंगळे, बाळासाहेब शिंदे, विलास शिवरकर, गोविंद तोरणे, बापूराव कदम, रामचंद्र काटकर, अशोक शेळमकर यांच्या कार्यकुशलमुळे कर्मचार्यांना देखील 25 टक्के बोनस वाटप करण्यात आल्याचे संस्थेचे व्यवस्थापक भोसले यांनी सांगितले.





