Pune District : प्रहार संघटनेने महामार्ग रोखला

कारेगाव येथे चक्काजाम आंदोलन
रांजणगाव गणपती – राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व दिव्यांग बांधवांचे विविध प्रश्न तातडीने सोडवावेसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शिरूर तालुका प्रहार जनशक्ती पक्ष व शिरूर प्रहार अपंग क्रांती संघटना यांनी (दि.२४) कारेगाव येथे पुणे-नगर महामार्ग अडवत चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष राहुल वाळके यांनी केले. यावेळी दोन्ही बाजूंची वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. आंदोलकांनी तहसीलदार येईपर्यंत आंदोलन मागे घेण्यास नकार दिला होता. मात्र, नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली. निवेदन स्वीकारले. त्यांच्या मागण्या शासनासमोर मांडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
आंदोलनात प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या पुणे जिल्हा महिलाध्यक्ष अनिता कदम, महिला जिल्हा उपाध्यक्ष उज्वला गाडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे, पुणे जिल्हा संघटक भास्कर गवारे, शिरूर तालुकाध्यक्ष नारायण नवले, महिला तालुकाध्यक्ष ज्योती हिवरे, माया फलके, संभाजी नवले,
मनेश सोनवणे, दत्तात्रय तरटे, शेकडो दिव्यांग, शेतकरी, मेंढपाळ, मच्छीमार, कामगार, कार्यकर्ते सहभागी झाले होते. रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन शांततेत पार पडले. आंदोलनानंतर पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.





