मंचर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुतार समाजाच्या उन्नतीसाठी महत्त्वाची योजना म्हणून आणली आहे .त्याचा फायदा समाज बांधवानी घेऊन व्यवसाय वृद्धीसाठी करावा, असे प्रतिपादन भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हा अध्यक्ष संजय थोरात यांनी केले.मंचर शहरातील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयामध्ये अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ आंबेगाव तालुका “दिनदर्शिका प्रकाशन” सोहळा भाजप नेते संजय थोरात यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी भाजप ज्येष्ठ नेते रवींद्र त्रिवेदी,सुरेश अभंग,नवनाथ थोरात,कालिदास गांजाळे,नितीन बारवकर,संजय भालेराव,संतोष पांचाळ,आदिनाथ सुतार, रोहिदास सूर्यवंशी,निलेश भालेराव,पंकज भालेराव, बाळासाहेब गाडेकर,किसन भालेराव,कैलास राऊत, कचरदास भालेराव,बलभीम पांचाळ,दिलीप पांचाळ,सुदर्शन भालेराव,महिला मोर्चाच्या स्नेहल चासकर,जागृती महाजन,सगुना बाणखेले,छाया राऊत,निर्मला भालेराव व पदाधिकारी उपस्थित होते. संजय थोरात म्हणाले की,समाजाच्या विकासामध्ये सुतार समाजाचे योगदान खूप मोठे आहे .हा समाज खऱ्या अर्थाने प्रभू विश्वकर्मा यांच्या शिकवणीप्रमाणे वाटचाल करत आहे . विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून तीन लाख रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य केलं जातं जर कोणाला काही अडचण,समस्या असल्यास त्यांनी मंचर येथील भाजप कार्यालयाशी संपर्क करावा तसेच या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले .कार्यक्रमाची प्रस्तावना मिथुन पांचाळ , आभार अध्यक्ष नितीन बारवकर यांनी मानले.