सासवड : काहींनी घरात बसून राज्य चालवण्याचा प्रयत्न केला फेसबूक लाईव्ह करून हे राज्य चालत नाही कार्यकर्त्यांसाठी जनतेत जावे लागते कार्यकर्त्यांच्या जीवावर सत्ता मिळते व त्यामधून राज्य चालते कार्यकर्ता अडचणीत असेल तर त्यासाठी गावात गल्लीबोळा मध्ये जावे लागते घरात बसून राज्य चालवता येत नाही. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना जनतेने घरात बसवले असल्याचा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. सासवड येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, तमाम लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, तरुण, जेष्ठ नागरिक या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे समाधानाचे व धडाकेबाज निर्णय घ्यावे लागतात. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधक न्यायालयात गेले; परंतु लाडक्या बहिणीने निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. विरोधी पक्ष नेता होईल तेवढे पण संख्याबळ त्यांच्याकडे राहिला नाही. विरोधकांचा लाडक्या बहिणी सुपडा साफ करून टाकला या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला. विरोधकांना मतदारांनी घरी बसवले असून विरोधकांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ते आता आत्मपरीक्षण न करता आमच्या चुका जनतेसमोर मांडत आहेत. लाडकी बहीण योजना ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होऊ देणार नाही. लाडका भाऊ ही बहिणीने दिलेली पदवी ही माझ्यासाठी मोठी आहे. तयारीला लागा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या महत्त्वाच्या असून सदस्य नोंदणी देखील मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे व राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद महानगरपालिका यांच्या निवडणुकांसाठी तयारीला लागण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.