पुणे जिल्हा : आळंदीत पोलिसांचा शांततेसाठी रूट मार्च

आळंदी : येथील आळंदी पोलीस स्टेशनचे वतीने वरिष्ठ पोलीस प्रशासनाचे मार्गदर्शक सूचनादेशाप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ 3 चे चाकण विभाग सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, आळंदी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक बी. एस. नरके यांचे प्रमुख उपस्थितीत शांततेसाठी रूट मार्च काढून संचलन केले. यावेळी आळंदी पोलीस स्टेशन अंतर्गत आळंदी आणि चिंबळी गावात रूटमार्च झाला. यावेळी पोलीस कर्मचारी वृंद उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे तारखा जाहीर करून राज्यात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. विधानसभा निवडणूक शांततामय आणि निर्भय वातावरणात व्हावी. राज्यात मतदारांनी कोणत्याही धमक्या व अफवांना बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क वापरावा. यासाठी आळंदी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील तीर्थक्षेत्र आळंदीत मुख्य नगरप्रदक्षिणा मार्गावरून तसेच शहरात विविधी मार्गावरून आळंदी पोलिसांनी संचलन करीत आळंदीसह चिंबळी येथेही रूट मार्च काढला.
समाज कंटकांना यातून दहशत मिळून निवडणुका निर्भय वातावरणात होण्यास मदत होणार आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यात सार्वत्रिक विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. आळंदीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल विभाग, स्थानिक पोलिस स्टेशनच्या वतीने संचलन उत्साहात करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ 3चे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गौर, आळंदी पोलिस स्टेशनचे निरीक्षक भिमा नरके, पोलिस नाईक मच्छींद्र शेंडे यांचेसह पोलीस कर्मचारी, महिला पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.





