पुणे जिल्हा : पिंपरी पेंढार ग्रामपंचायत व पोस्ट ऑफिस चोरट्यांनी फोडले
Updated On:

ओतूर (प्रतिनिधी) : पिंपरी पेंढार (ता.जुन्नर)येथील ग्रामपंचायत व पोस्ट ऑफिस कार्यालय सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरटयानी फोडली.
कल्याण- नगर राष्ट्रीय महामार्गालगत हाकेच्या अंतरावर ही चोरी झाली ग्रामपंचायत व पोस्ट ऑफिस यांची कुलपे तोडून चोरटयानी आत प्रवेश करून टेबलचे व कपाटाचे दरवाजे उघडले परंतु रोख रक्कम नसल्याने त्यांना काही मिळाले नाही.
परंतु ग्रामपंचायतमध्ये जवळपास चाळीस ते पन्नास हजार रूपयांचे असणारे सी.सी.टीव्हीचे दोन डी.व्ही.आर चोरटयानी चोरुन नेले.
याबाबत ओतुर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नरेंद्र गोराने, सागर शिंदे,जोतिराम पवार तपास करत आहे.पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले होते.





