पुणे जिल्हा : मेडीक्लेममध्ये आईवडिल व सासू सासऱ्यांनाही लाभ

सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज सोसायटीचे चंद्रकांत पाटील यांची माहिती
शिक्रापूर – सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज सोसायटीच्या सभासदांच्या मेडीक्लेम योजनेत आई- वडिल व सासू सासरे यांचाही समावेश करून त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
शिक्रापूर येथील सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीसह सोसायटीच्या पुणे, पिंपरी चिंचवड या शाखेचा सभासद पाल्य गुणगौरव सोहळा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते.
यावेळी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव सतीश गवळी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, कार्याध्यक्ष शिवाजी कामठे, माजी अध्यक्ष सुजीत जगताप, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संभाजी पडवळ, कुंडलिक मेमाणे, शिक्रापूर सोसायटीचे पालक संचालक तुकाराम बेनके, पुणे जिल्हा शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्रकुमार थिटे, विठ्ठल गवारी, सहसचिव सतिश माने, खजिनदार सतेश शिंदे, संचालक जगन्नाथ जाधव, प्रमोद देशमुख, गोविंदराव सुळ, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळचे उपाध्यक्ष व संचालक सचिन नलावडे, शकिल अन्सारी, अजित चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन दत्तात्रय रोकडे यांनी केले. प्रास्ताविक उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे यांनी केले आणि पालक संचालक तुकाराम बेनके यांनी स्वागत केले तर पांडुरंग कणसे यांनी आभार मानले.
वेगळा प्रीमियम भरून सहभाग घ्या
अध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, पूर्वीची तीन लाख रुपये कॅशलेस मेडीक्लेम योजना आता एक नोव्हेंबरपासून पाच लाख रुपये कॅशलेस मेडीक्लेम योजनेत विस्तारीकरण करण्यात येणार असताना शिवाय ज्या सभासदांना आपल्या आई वडील आणि सासू सासरे यांचा समावेश या योजनेत करावयाचा असल्यास वेगळा प्रिमियम भरुन सहभागी होता येईल, असे पाटील यांनी सांगितले.





