पुणे जिल्हा : कर्हामाईच्या काठावर पालख्यांचे स्वागत

माऊली आळंदीकडे मार्गस्थ तर श्री संत सोपान काका सोपानकाका , चांगावटेश्वर महाराज विसावले
सासवड – संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी रात्री वाल्हे मुक्कामी होती. त्यानंतर पहाटे देवांना अभिषेक, आरती होऊन पालखीने प्रस्थान ठेवले. दौंडज, जेजुरी, शिवरी मार्गे पालखी सासवड शहरात आली.
आगमन झाल्यानंतर संत सोपान काका मंदिरामध्ये स्वागत करण्यात आले. तर श्री संत सोपानकाका महाराज यांची पालखी सोपानकाका मंदिरामध्ये विसरली तर चांगावटेश्वर महाराज यांची पालखी लक्ष्मीमाता मंदिरामध्ये विसावली.
सासवड येथील कर्हा नदीच्या पुलावरून मृदंगाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत सोपान काका महाराज श्री संत चांगभटेश्वर महाराज यांच्या पालखी पालखीने सासवड शहरात प्रवेश केल्यावर सासवडकर मंडळींनी पालखीचे स्वागत केले. कर्हा नदी काठावर पालखीचा विसावा झाला.
या ठिकाणी स्वकामसेवा मंडळ आळंदी यांच्या वतीने 27 वर्षांपासून भेळ वाटप करण्यात येत आहे. त्यानंतर जेजुरीनाका, भुमीअभिलेख, कन्हैया चौक, अमर चौक मार्गे संत सोपनदेव मंदिरात आली. या ठिकाणी मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी मंदिरात विसावली. सोपानकाका मंदिरात पंचपदी, समाज आरती, महाप्रसाद, किर्तन झाले. त्यानंतर सकाळी महाप्रसाद होऊन पालखीचे दिवेघाट मार्गे हडपसरकडे प्रस्थान ठेवेल.





