माळेगाव : उद्याच्या उज्वल भविष्यासाठी मन, मनगट व मेंदू ताब्यात घ्या. असे मत प्रा. युवराज पाटील यांनी व्यक्त केले. शारदाबाई पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिवनगरमध्ये “उद्याच्या उज्वल भविष्यासाठी” या विषयावर आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. यावेळी ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रा. पाटील म्हणाले की, कोणतीही गोष्ट करत असताना प्रयत्न सोडू नका. जरी त्यामध्ये आपल्याला अपयश आले तरीदेखील त्या गोष्टीपासून दूर जाऊ नका. आपल्याला ध्येयप्राप्ती होईपर्यंत त्याचा पाठलाग करत रहा. यावेळी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक रंजन तावरे, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे, एस. एस. एम. हायस्कूलचे प्राचार्य डी. एस. माने उपस्थित होते. एस. एस. एम.हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या. उपप्राचार्य स्वाती भोसले यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक अंकुश कोकरे यांनी स्वागत केले. यावेळी शिक्षक प्रतिनिधी विकास ठाकर उपस्थित होते. हा कार्यक्रम माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोकराव सस्ते यांच्या प्रयत्नातून घेण्यात आला होता. सूत्रसंचालन नवनाथ कुंभार यांनी केले. सुरेखा नलवडे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष विश्वजित चव्हाण, अभिजित काटे, विद्या कुंभार, सिमिंतिनी नलवडे, दीपा ताटे, शिस्त विभाग प्रमुख मामराज रणवरे, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहकार्य केले.