पुणे जिल्हा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने विजयी नवनियुक्त आमदारांचा उद्या सन्मान

आगामी निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी विशेष बैठक
इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले.
विजयी झालेले सर्व नवनियुक्त आमदार यांचा सन्मान समारंभ शनिवारी (दि. ३०) शिवस्मारक सभागृह पुणे – सातारा रोड धनकवडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा कार्यालयाशेजारी आयोजित केला असल्यांची माहिती जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
त्याचप्रमाणे तातडीने होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रणनीती आखणेबाबत, प्रदेश कार्यालय यांच्या वतीने आलेल्या सूचनेनुसार,सर्व निमंत्रित पदाधिकारी यांची विशेष बैठक पार पडणार आहे.
तरी जिल्हयातील सर्व प्रमूख पदाधिकारी यांनी आवर्जून बैठकीला उपस्थित रहावे.असेही अवाहन,राष्ट्रवादी काँग्रेस चे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले आहे.





