Pune District : माऊलींना एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
Updated On:

आळंदी – नांदेड येथील भारत रामिनवार आणि मिरा रामिनवार यांनी मंगळवारी (दि. 17) आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी सुमारे 1 कोटी रुपये किंमतीचा 1 किलो सोन्याचा अलंकारिक मुकुट भक्तीभावाने अर्पण केला.
पुणे येथील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.ने चार महिन्यांच्या अथक परिश्रमातून हा मुकुट तयार केला आहे.
या मुकुटात पारंपरिक नक्षीकाम, धार्मिक प्रतीकांची कोरीव रचना आणि आधुनिक थ्रीडी तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट संगम दिसून येतो. कमळ, चक्र, सूर्यकिरण यासारख्या मंगल प्रतीकांनी हा मुकुट सजवला असून, वारकरी परंपरेशी नाते असलेल्या कुशल कारागिरांनी तो भक्तीभावाने घडवला आहे.





