Pune District : माऊलींच्या पालखीसाठी 12 किलो चांदी अर्पण
Updated On:

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस उरले असताना यंदाच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त माऊली भक्त संतोष गणपतराव मोरगे (जि. नांदेड) यांनी अपार भक्तिभावातून 12 किलो चांदी माऊलींच्या चरणी अर्पण केली आहे. ही चांदी माऊलींच्या पालखीच्या नूतनीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, पालखीच्या संपूर्ण नूतनीकरणासाठी लागणार्या मजुरीचा सर्व खर्च देखील मोरगे परिवाराकडून देण्यात येणार आहे. यासोबतच अधिक 4 किलो चांदी लवकरच त्यांच्या कडून अर्पण केली जाणार असल्याची माहिती विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे यांनी दिली.
हे पावन कार्य 12 जून 2025 पर्यंत पूर्णत्वास येणार आहे. नूतनीकरणाच्या प्रारंभानिमित्त पालखी पूजन सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला.





