पुणे जिल्हा। मुळशी धरण ७० टक्के भरले
Updated On:

मुळशी । मुळशी धरण परिसरात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत आहे. मुळशी धरण जलाशय सकाळी ७ या ७० टक्के क्षमतेने भरले आहे. आज दुपारी २ वाजता धरणाच्या सांडव्यावरून २ हजार ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे.
दरम्यान, नदी पात्रात पाऊस सतत वाढत राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी /जास्त करण्यात येईल. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे.
वडीवळे धरणाच्या सांडव्यावरून कुंडलीका नदी पात्रामध्ये १० हजार क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे.पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.





