लासुर्णे – धनगर समाज आरक्षणप्रश्नी धाराशीवचे युवा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात दिल्ली येथे धनगरांना (एस. टी) आरक्षण सवलत लागू करावी याबद्दल लक्ष वेधून धनगर समाजाची बाजू मांडली. या बद्दल लासुर्णे (ता इंदापूर) येथील भाजपाचे गजानन वाकसे यांनी धाराशिव येथे जाऊन खासदार ओमराजे यांचा सत्कार केला. खासदार निंबाळकर यांनी महिन्याभरापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पञाव्दारे धनगर आरक्षण अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली होती. समस्त धनगर समाजाच्या वतीने खासदार ओमराजे निंबाळकर यांचा त्यांच्या गावी गोवर्धन वाडी (धाराशीव) येथे धनगरी घोंगडी देवून सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्ह्याध्यक्ष गजानन वाकसे, मधुकर शेंडगे, राजाभाऊ थोरात, आसाराम वायकुळे, दत्तात्रय वाघमोडे, सुदर्शन शेंडगे, संदीप थोरात व बारामती, इंदापूर, टेंभुर्णी परिसरातील धनगर युवक बांधव उपस्थित होते.