उरुळी कांचन : उरुळी कांचन – जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात कठड्याला धडकून झालेल्या अपघातात दुधाच्या टँकरमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. शिंदवणे घाटात गुरुवारी (दि. 16) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा दुधाचा टँकर हा सोनाई दूध परिवार यांचा आहे. या ठिकाणी उरुळी कांचन येथील कस्तुरी रुग्णवाहिका, कदम रुग्णवाहिका दाखल झाल्या असून पुढील कार्यवाही सुरु आहे. दरम्यान, घटनास्थळी उरुळी कांचन पोलीस व स्थानिक नागरिकांनी मदत केली.