पुणे जिल्हा । शिरुर तालुक्यात पतीच्या नातेवाईकाकडुन विवाहित महिलेचा विनयभंग

निमोणे -शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका गावात एका २४ वर्षीय विवाहित महिलेला फोन करुन तिचा पती घरी नसल्याचा फायदा घेत पतीच्या जवळच्या नातेवाईकाने (दि १२)ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास घरात शिरुर तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असुन याबाबत शिरुर पोलिस स्टेशनला बाजीराव बाळासाहेब थोरात (रा.बोरी ता.श्रीगोंदा जि. अ. नगर) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका गावात फिर्यादी असलेल्या २४ वर्षीय महिलेला तिच्या पतीच्या जवळचा नातेवाईक बाजीराव बाळासाहेब थोरात याने फोन करुन तुला आईस्क्रीम आणू कां…? असे विचारले. त्यावर फिर्यादीने मला आईस्क्रीम नको असे सांगितले. त्यानंतर १२:३० च्या सुमारास बाजीराव थोरात हा फिर्यादीच्या राहत्या घरासमोर आला. त्यावेळी त्यास फिर्यादी महिलेने माझे पती घरी नाहीत. तू घरी येवु नको असे सांगितले. तरीही तो घरात येवु लागला.
त्यावेळी फिर्यादी महिला त्यास बाहेर ढकलु लागली असता त्याने फिर्यादीला घरात ढकलले आणि तिचे दोन्ही हात धरुन तु मला आवडतेस तू मला हवी आहे असे बोलुन फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यावेळी फिर्यादी महिलेने आरडाओरडा करु लागली असता. त्याने त्यांचे तोड दाबले त्यानंतर फिर्यादीचा पती हे कामावरुन घरी आले. त्यानंतर त्यांना पाहुन तो फिर्यादीला ढकलुन देवुन निघुन गेला. म्हणुन आरोपी विरुध्द शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोलिस नाईक मोरे हे करत आहेत.





