सासवड : पुरंदर तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत मंगळवारी रोजी सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहामध्ये काढण्यात आली. यामध्ये सर्वसाधारणसाठी २९, सर्वसाधारण स्त्रीसाठी २९, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १२, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी १३, अनुसूचित जातीसाठी ३, अनुसूचित जाती स्रीसाठी ४ अनुसूचित जमाती १, अनुसूचित जमाती स्रीसाठी २ याप्रमाणे ९३ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. पुरंदर तालुक्यातील एकूण ९३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत, निवासी नायब तहसीलदार सचिन पाटील, महसूल नायब तहसीलदार सोनाली वाघ उपस्थित होते. आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आल्या. यावेळी काढण्यात आलेले सरपंचांचे आरक्षण पुढीलप्रमाणे- अनुसूचित जाती स्रीसाठी – कोळविहीरे, हरगुडे, तोंडल, नाझरे सुपे, अनुसूचित जाती- मावडी सुपे, वनपुरी, कुंभारवळण, अनुसूचित जाती जमाती- काळदरी, अनुसूचित जाती जमाती स्री, चिव्हेवाडी घेरापुरंदर, नागरिकांचा मागास प्रवर्ग- राख, पिंपळे, पोंडे, शिवरी, कोथळे, खानवडी, पारगाव, हिवरे, मांढर, थोपटेवाडी, वीर, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्री- बेलसर, खळद, साकुर्डे, वाल्हे, सोनोरी, वागदरवाडी, भिवरी खेंगरेवाडी, रिसे, भोसलेवाडी, वाघापूर गुऱ्होळी, भिवडी. सर्वसाधारण स्त्री – पांगारे, नावळी, धनकवडी, दवणेवाडी, देवडी, नीरा, सटलवाडी, पिसर्वे, पिंगोरी, झेंडेवाडी, तक्रारवाडी, वाळुंज, हरणी, चांबळी, लपतळवाडी, राजेवाडी, नायगाव, धालेवाडी, दिवे, पिंपरी, बोऱ्हाळवाडी, सटलवाडी, बोपगाव, पांडेश्वर, पिंपरे खुर्द, माहूर, पूरपोखर, कोडीत खुर्द, जवळार्जुन. सर्वसाधारण- नवलेवाडी, बहिरवाडी, उदाचीवाडी आंबळे नाझरे कप, मांडकी निळुंज कर्नलवाडी कोडीत बुद्रुक, सुपे खुर्द, टेकवडी पिसुर्टी, मावडी कप गुळूंचे एकतपुर मंजवडी राजुरी माळशिरस रानमळा, आस्करवाडी, सोमर्डी, परिंचे, सिंगापूर, दौंडज, गराडे, पानवडी, पिसे, केतकावळे, आंबोडी.