तळेगावात अशोक पवार यांच्या प्रचारार्थ सभा
शिक्रापूर – सध्या महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे यांची सुनामी आलेली असल्याने महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही, असे सांगितले याचा अर्थ राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, हे नक्की असल्याचे वक्तव्य खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.
शिरुर- हवेली विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ तळेगाव ढमढेरे येथील सभेत खासदार डॉ. कोल्हे बोलत होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे, तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, सरचिटणीस ज्ञानेश्वर थेऊरकर, बाळासाहेब नरके, शिवंसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष पोपट शेलार, माजी उपसभापती जयमाला जकाते आदी उपस्थित होते.
डॉ. कोल्हे यांनी गुलाबी रंगाने महाराष्ट्राचा गद्दारीचा कलंक झाकला जात नाही असा टोला देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावत शेतकऱ्यांच्या पिकला मिळणाऱ्या हमीभाव तसेच शेतकरी आत्महत्या बाबत सरकारवर ताशेरे ओढले.
कोल्हे म्हणाले की, घोडगंगा कारखान्याचा विषय काढून अशोक पवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेतून दादा, शिंदे व फडणवीस यांना सत्तेतून पायउतार करा. असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
ते म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील अनेकजण शरद पवार यांना सोडून गेले. मात्र, अशोक पवार हे शरद पवार यांच्यासोबत राहिल्याने राज्याचे लक्ष या उमेदवारीवर लागले आहे. अशोक पवार म्हणाले की, आज तालुक्यातील सर्व पुढारी व गँगमधील सर्वजण मला पराभूत करण्यासाठी एकत्र झाले आहेत. मात्र, माझा जनतेवर माझा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांचे भाषण झाले.