पुणे जिल्हा : वाघाळेच्या उपसरपंचांच्या धाडसामुळे बिबट्या जेरबंद

रांजणगाव गणपती : वाघाळे ता. शिरूर येथील उपसरपंच दादासाहेब सोनवणे यांच्या कोंबड्याच्या खुराड्यात रविवारी २९ सप्टेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास बिबट्या शिरला होता. मात्र प्रसंगावधान राखून त्यांनी बिबटया कोंडून घेतल्याने पुढील अनर्थ टाळला त्या मुळे दादासाहेब सोनवणे यांच्या धाडसा चे कौतुक होत आहे.
रविवारी २९ सप्टेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास बिबट्या शिरला होता त्यांना कोंबड्यांचा आवाज आल्याने जाग आली व जाळीमध्ये बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी प्रसंगावधान राखून सीताफिने खुराड्याचा दरवाजा बंद केला व वन कर्मचारी हनुमंत कारकूड यांच्याशी फोनवर संपर्क केला.
हनुमंत कारकूड यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून रेस्क्यू टीम बोलावली. वन परीक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या
मार्गदर्शनानुसार वनपाल गणेश म्हेत्रे , वन कर्मचारी हनुमंत कारकूड, रेस्क्यू टीमचे जयेश टेमकर, ऋषिकेश विधाटे, शुभम शिस्तार, सुदर्शन खराडे, सचिन गोडसे यांनी मोठया सीताफिने पिंजऱ्यात बिबट्यास जेरबंद केले.
बिबट्याने सोळा कोंबड्यांचा फडशा पाडला. उप सरपंचांनी केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.दादासाहेब सोनवणे यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी सोसायटी चे माजी चेअरमन सूर्यकांत बढे , नितीन भोसले, बबनराव भोसले, ,एकनाथ डफळ यांनी केली





