Pune District : कडूस येथील तलाव तुडुंब

आमदार काळेंच्या हस्ते जलपूजन
कडूस – यावर्षी कडूस येथील लघु पाटबंधारा तलाव पूर्ण भरल्याने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते श्रीफळ, साडीचोळ आणि फुले अर्पण करून जलपूजन करण्यात आले.
याप्रसंगी भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष दिलीप ढमाले, उपाध्यक्षा कमला नेहेरे, सरपंच हेमलता खळदकर, युवा नेते,उद्योगपती संजय घनवट, खरेदी-विक्री संघाचे संचालक संतोष ढमाले, मुकूंद धायबर, सभापती किसन नेहेरे, ज्ञानेश्वर तुपे, सचिव संतोष गारगोटे, व्यवस्थापक किसन नेहेरे, उद्योजक किशोर शेळके, मारुती जाधव, चांगदेव ढमाले, लक्ष्मण नेहेरे, पंडित पोटे, रत्नाकर डांगेले, बाळासाहेब चिपाडे, विश्वास नेहेरे, मोहन गारगोटे, भगवान ढमाले, शिवाजी बंदावणे, सुनंदा धायबर, बाळासाहेब पांगारे, शांताराम अभंग, पुरोहित रमाकांत गोडसे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने 2.25टीसीएम पाणीक्षमता असलेला हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. भैरवनाथ पाणी वाटप संस्थेच्या माध्यमातून शेतकर्यांना पिकांसाठी आणि गावाला पाणीपुरवठ्याची नियोजनानुसार व्यवस्था केली जात असल्याने आमदार काळे यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक करून पुढील काळात संस्थेला तत्परतेने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तलावाचे सभोवती आकर्षक सौंदर्यासाठी, वृक्षारोपण, भिंती वरील रस्ता दुरुस्ती करण्याची सूचना आमदार बाबाजी काळे यांनी केली.





