पुणे जिल्हा : लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : केंद्राकडून सगळे प्रस्ताव मंजूर होतात
सासवड – राज्यातील मुलींना शिक्षणासाठी संपूर्ण खर्च राज्य शासन उचलत असून देशातील आपले पहिले राज्य आहे. की मुलींना मोफत शिक्षण दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी यशस्वीपणे वयोश्री योजना राबवली जात आहे. लाडकी बहीण योजना सुरू राहणार असून कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद करणार नाही. उलट यामध्ये 2100 रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे जेवढे काही प्रस्ताव पाठवले जातात त्या सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
सासवड (ता. पुरंदर) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माजी राज्यमंत्री विजय शिवतरे यांच्या प्रचारार्थ आलेल्या सभेमध्ये बोलत होते. यावेळी उमेदवार विजय शिवतारे, माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, भगवान साळुंखे, रमेश कोंडे, राहुल शेवाळे, ममता शिवतारे-लांडे, संजय मिष्कील आदी उपस्थित होते.
केंद्राकडून आतापर्यंत 10 लाख कोटी मिळाले
केंद्र सरकारकडून आतापर्यंत 10 लाख कोटी रुपये आम्हाला मिळाले हे सरकार हे सर्वसामान्यांचे आहे, हे सरकार नवीन योजना करताना सर्व शेतकर्यांना विश्वासात घेऊनच योजना करीत असते समृद्धी महामार्गामध्ये शेतकर्यांना विश्वासात घेऊन हा रस्ता या सरकारने पूर्ण केला.
युवा उद्योजकांना स्टायपेंड देण्याची योजना, एक रुपयामध्ये पिक विमा, मुलींना मोफत शिक्षण यासारख्या योजना आम्ही राबवल्या शेतकर्यांसाठी पूर्ण विजबिल माफ, घरगुती 30 टक्के सवलत, 25 हजार महिला पोलिस दलात भरती निर्णय, यासारखे निर्णय आमच्या सरकारने घेतले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.





