पुणे जिल्हा : मुंबईच्या कुलस्वामिनी क्रेडिट सोसायटीचा एक हजार कोटींच्या ठेवीचा टप्पा पूर्ण

-अध्यक्ष शंकरशेठ पिंगळे व उपाध्यक्ष आमदार शरद सोनवणे यांची माहिती
मंचर – मुंबई येथील कुलस्वामिनी को-ऑप. क्रेडिट सोसायटीने नुकताच एक हजार कोटींच्या ठेवीचा टप्पा पार करून तर पंधराशे कोटींच्या ठेवींकडे वाटचाल केली आहे. क्रेडिट सोसायटीने मागील ४१ वर्षांपासून कार्यरत आहे,अशी माहिती अध्यक्ष शंकरशेठ पिंगळे व उपाध्यक्ष आमदार शरद सोनवणे यांनी दिली.
कुलस्वामिनी को-ऑप. क्रेडिट सोसायटी पतसंस्थेच्या वतीने व्यवसाय वृद्धीबाबत स्वमालकीच्या एकूण १७ शाखा आहेत. सहकारातून समाज विकास परिवर्तन सीबीएस कार्यप्रणालीद्वारे एसएमएस बँकिंग, एबीबी सेवा देणारी राज्यस्तरीय पतसंस्था आहे. या पतसंस्थेने संमिश्र व्यवसायाचा १८०० कोटींचा टप्पा पार केला असून २५०० कोटींकडे वाटचाल केली आहे.
या पतसंस्थेला आजपर्यंत विविध प्रकारचे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यामध्ये बँक पुरस्कार, दीपस्तंभ राज्यस्तरीय पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन पुरस्कार, कोअर बँकिंग प्रणाली पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे. तसेच या पतसंस्थेचे मोबाईल अॅपद्वारे दैनंदिन ठेव संकलन करणे, आरटीजीएस व एनएफटीसारखी सेवा या पतसंस्थेकडून ग्राहकांना दिली जात आहे.या पतसंस्थेकडून आकर्षक ठेव योजना देखील कार्यान्वित केल्या आहेत.
त्यामध्ये ३ वर्षे व त्यापुढील कालावधीसाठी सर्वसामान्य ग्राहकांना ८.५० टक्के व्याजदर, ज्येष्ठ नागरिकांसाठी ८.७५ व्याजदर दिला जातो. दुसरीकडे ४०१ दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी ९ टक्के व्याजदर सर्वसामान्य ग्राहकांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी ९.२५ टक्के व्याजदर दिला जात आहे.
या पतसंस्थेची ग्राहक संख्या १,१५,९१६, निधी ६९.८५ कोटी रुपये , गुंतवणूक २७५ कोटी रुपये, सभासद कर्ज ८१३ कोटी रुपये, वसूल भाग भांडवल ५०.५९ कोटी रुपये, स्वनिधी १२०.४४ कोटी रुपये, सभासद ठेवी ९८८ कोटी रुपये, खेळते भांडवल ११५८ कोटीं रुपयाचे असून पतसंस्थेच्या सेवेत ३२७ कायम सेवक असल्याचे सांगितले.





