पुणे जिल्हा : काटेवाडीच्या उपसरपंचपदी काटे

काटेवाडी – काटेवाडी (ता. बारामती) गावच्या उपसरपंच पदासाठी केवळ मिलिंद काटे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या सरपंच मंदाकिनी भिसे यांनी मिलिंद काटे यांची काटेवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, माजी सरपंच विद्याधर काटे, माजी उपसरपंच श्रीधर घुले, राजेंद्र पवार, दादा भिसे, अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनील मुसळे, प्रकाश काटे, रवींद्र घुले, सागर भिसे, राहुल काटे, अजित काटे, अमर जगताप, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, बाळासाहेब भिसे, पोलीस पाटील सचिन मोरे, सर्व सदस्य उपस्थित होते.
काटे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार व हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावाचा विकास होण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी योग्य ते प्रयत्न करेन. सुनेत्रा पवार मार्गदर्शन करतील विकासाबाबत आम्ही सर्वजण कुठेही कमी पडणार नाही. नागरिकांच्या विकासाबाबतीत आम्ही कटिबद्ध राहू.





