पुणे जिल्हा : इंद्रायणीला जलपर्णीचा वेढा
Updated On:

चिंबळीतील केटी बंधा-यात काळपट पाणी
चिंबळी – पवित्र अशा इंद्रायणी नदीला प्रदूषित पाण्याचा शाप मिळाला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चिंबळी-मोशी हद्दीत नदीवर उभारण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधा-यातील पाणी काळपट व रसायन मिश्रीत असून जलपर्णीचाही वेढा वाढला आहे.
दरम्यान, जलपर्णी काढण्यास सुरुवात केली असली तरी हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून ज्या ठिकाणी जलपर्णी काढली त्या ठिकाणी दुप्पटीने वाढलेली दिसून येत आहे.
तर हे रसायन मिश्रीत पाणी नदीपात्रा जवळील गावांच्या विहिरी, बोअरवेलमध्ये झिरपत असल्याने नागरिकांना विविध आजार जडत असून पिकांनाही हे पाणी हानिकारक ठरत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.





