पुणे जिल्हा : जॅकी श्रॉफ यांच्याकडून वाघोलीकरांचे कौतुक

वृक्ष संवर्धन कार्याची रामकृष्ण सातव पाटील यांनी दिली माहिती
वाघोली : वाघोली तालुका हवेली येथे सिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी भेट देत वाघोलीकरांचे वृक्ष संवर्धनाबद्दल कौतुक केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील, गणेश सातव आणि इतर ग्रामस्थ यांच्या समवेत वाघोली मधील आर के हाऊस या ठिकाणी धावती भेट देत वृक्ष संवर्धनाबद्दल वाघोली ग्रामस्थांचे सिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी कौतुक करून पाठीवर थाप दिली असल्याची माहिती रामकृष्ण सातव पाटील यांनी दिली.
वृक्ष संपदा आणि वृक्ष संवर्धन या दोन्ही बाबतीत अनेक दिवसांपासून सिने अभिनेते जॅकी श्रॉफ प्रचार आणि प्रसार करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर वाघोली येथील ग्रामस्थांशी संवाद साधत वाघोली मधील वृक्षारोपण वृक्ष संवर्धन व वृक्ष चळवळी बाबत माहिती घेत ग्रामस्थांचे कौतुक केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील यांनी वाघोली मधील विविध सोसायटी, रस्त्यांच्या दुतर्फा, मोकळ्या जागा, विविध मंदिरांचा परिसर आदी भागात केलेल्या वृक्ष लागवडी बाबत व संवर्धनाची माहिती जॅकी श्रॉफ यांना दिली. विविध वृक्षांच्या जाती, प्रजाती संवर्धित करून वृक्षसंपदा अबाधित ठेवण्याबाबत जॅकी श्रॉफ यांनी ग्रामस्थांना आवाहन केले. सिने अभिनेत्याला भेटून ग्रामस्थ भारावून गेले होते.
वृक्ष भेट देऊन वृक्ष संवर्धन व वृक्ष संपदा या बाबतीत एक चळवळ उभी करणाऱ्या सिने अभिनेत्याला भेटून अभिमान वाटला. वाघोली करांच्या वृक्ष संवर्धनाच्या कार्यात वेळोवेळी मार्गदर्शन व मदत करण्याचे आश्वासन सिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी दिले.
रामकृष्ण सातव पाटील संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे





