पुणे जिल्हा : संविधान वाचवणे लोकप्रतिनिधींची जबाबदारी

आमदार बाबाजी काळे ः राजगुरुनगर येथे संविधान गौरवदिन
राजगुरुनगर – भारतीय संविधान वाचवणे लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. संविधानाला कोणहही धक्का लावू शकत नाही, असे प्रतिपादन नवनिर्वाचित खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी राजगुरुनगर येथे केले.
राजगुरुनगर येथे संविधान गौरवदिन निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी पुणे जिल्हा समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम घुमटकर, तालुका खादी ग्रामोद्योगचे अनिल कहाणे, ज्येष्ठ शिक्षक जि. रं. शिन्दे, नगरपरिषदचे निरीक्षक जगदीश नागलोत, संदेश कुंभार, विजय घेगडमल,
सुभाष कदम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती अध्यक्ष अशोक कडलक, कार्याध्यक्ष संतोष डोळस, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य भास्कर तुळवे, पर्यावरण उपाध्यक्ष रज्जाक भाई शेख, हरीश देखणे, भीमशक्ती तालुका अध्यक्ष, भीम शक्ती संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल जाधव, अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष जकिर अन्सारी, आदर्श शिक्षिका विद्या डोळस, प्रियांका कडलक, हेमंत वीरकर, अशोक वंजारे, शिव व्याख्याते संपत गारगोटे, बाबुराव गारगोटे, समीर पाटील, सुनील टोके, आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे यांचा समितीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. समितीकडून आमदार काळे यांना संविधानाची प्रत देण्यात आली. या दरम्यान आमदार काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संविधान दिन निमित्त आज सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समितीकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमात समितीचे अध्यक्ष अशोक कडलक यांनी त्रिसरण पंचशील पठण केले, त्यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन केले. या दरम्यान आंबेडकरी विचारांच्या अनुयायांनी उपस्थिती दर्शवून अभिवादन केले.
राजगुरुनगर :संविधान गौरव दिनानिमित्ताने येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी समितीच्या वतीने नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे यांना संविधानाची प्रत देण्यात आली.





