Pune District : इंद्रायणी नदीला पुन्हा पूर

नागरिकांना सतर्कतेचा इशारा : भक्ती सोपान पूल; भक्त पुंडलिक मंदिरात पाणी
आळंदी – इंद्रायणी नदीचे पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने तसेच खेड, मावळ तालुक्याती धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसाने धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्याने खबरदारीचे उपाय योजने अंतर्गत विविध धरणातून पाण्याचा विसर्ग पुढे सोडला जात असल्याने इंद्रायणी नदीचे पाण्याचे पातळीत वाढ झाली आहे.
या मुळे आळंदीतील इंद्रायणी नदीला पूर आला असून नदीचे पाण्यात आणि प्रवाहात वाढ होत आहे. यामुळे इंद्रायणी नदीचे दुतर्फा गावांतील तसेच शहरातील पाण्याचे पातळीसह नदी प्रवाह वाढला आहे. नदीचे दुतर्फा ये-जा करताना दक्षता घेण्याचे सूचना पाटबंधारे विभागाने दिल्या आहेत.
इंद्रायणी नदीने आळंदीत काठ ओलांडला असून भक्त पुंडलिक मंदिरात पाणी शिरले असून नदी लगतचे रस्ते रहदारीस बंद करून ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी नदी लगतच्या रस्त्यांना पर्याय वापरून रहदारी सुरक्षित होईल याची दक्षता घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे. पुणे पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता दि. म. डुबल यांनी जिल्ह्यातील विविध धरणातुन पाण्याचा विसर्ग पुढे सोडण्यात आला असल्याची माहिती दिली.
पाण्याचे विसर्ग नदीत सोडण्यास वाढविण्यात आले आहे. इंद्रायणीचे लाभक्षेत्रा पाऊस होत असल्याने इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. आळंदी येथील भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेला आहे. नदी लगतचे दगडी घाटावर भागीरथी कुंड देखील पाण्यात गेले आहे. विकसित दगडी घाटावर नदी पात्रालगत पाणी आले असून सिध्दबेटात पाणी शिरलेे आहे. आळंदीतील बंधार्यावरून पाणी खाली पडत आहे. चौंडी घाटावरील बंधार्यावरून पाणी खाली पडत आहे.
वडिवळे धरणाच्या सांडव्यातून कुंडली नदी पात्रात काल विसर्ग वाढवून 2103 क्युसेक करण्यात आला होता. पाऊस वाढत असल्याने येवा वाढत आहे. या परिस्थितीमुळे विसर्ग देखील वाढविण्यात आला असल्याचे पुणे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे. नदी लगतचे गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.





