Pune District : जेलरला संपवले तुलाही संपवेल

शिक्रापूर : सणसवाडी (ता. शिरूर) येथे दोन वाहनांचा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसाकडील 112 मशीन हिसकावून घेत पोलिसाला धक्काबुक्की करत मी पुण्याचा डॉन आहे, जेलरला संपवले तुला पण संपवेल अशी धमकी देत एकाने मारहाण केली. त्याच्या विरोधात शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋषिकेश हरिषचंद्र गुंजाळ (वय 29, रा. पांडवनगर गुंजाळवाडी, हुतात्मा राजगुरू विद्यालय पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. पुणे-नगर महामार्गावर सणसवाडी कारला (एमएच 16 डीसी 0475) पाठीमागून आलेल्या दुसर्या कारची (एमएच 12 सीवाय 5020) धडक बसून अपघात झाल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला.
दोघांनी डायल 112 वर फोन केल्याने शिक्रापूर पोलीस घटनास्थळी गेले. यावेळी दोन्ही कार चालकांशी बोलत डायल 112 मशीनवर माहिती भरत असताना ऋषिकेश गुंजाळ याने पोलिसाच्या हातातील डायल 112 मशीन हिसकावून घेत मोठ्याने आरडाओरडा करत तू साधा पोलीस आहे, तुला माहित आहे का, मी कोण आहे? मी बाऊंसर आणि पुण्यातील डॉन आहे, पुण्यातल्या जेलरला संपवले तू परत दिसला तर तुला संपवून टाकेन अशी धमकी दिली.
पोलीस कर्मचार्याच्या धक्काबुक्की करत रस्त्यावर ढकलून देत मारहाण केली. दरम्यान शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत ऋषिकेश गुंजाळ याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आले. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार हे करीत आहेत.





