बारामती :  माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत मी व्यक्तिशः काय करायचे ते ठरवलेले नाही. निवडणुका होतच असतात. माझं लक्ष कारखान्याचे बाकीचे काही प्रश्न आहेत त्यावर आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे या प्रतिक्रियेवर पवार यांनी निवडणुकीबाबत बगल दिली आहे.

जय पवार यांच्या साखरपुडा निमंत्रणाबाबत विचारले असता शरद पवार हे पत्रकारांवर संतापले. हा काय प्रश्न आहे का, जरा बोलायचं तर तुम्ही भान ठेवत जावा, असे सांगून त्यांनी पत्रकारांचे कान पिळले.

पवार म्हणाले की, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर देखील पवार म्हणाले की, शंभर टक्के ही एक क्रांती आहे. एआयच्या माध्यमातून आमचे लक्ष शेती आहे. उसाचे उत्पादन वाढीसाठी व उसामधील गुलकोटचे प्रमाण वाढवून उसाचा दर्जा हे सर्व यायच्या माध्यमातून होऊ शकते.

हे एआयचे कल्चर आणायचा आमचा बराच दिवस विचार होता. दक्षिण महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने सहभागी होतील. त्यांच्या सूचनेनुसार त्यांची एक बैठक या ठिकाणी आहे. यामध्ये 300 लोक सहभागी होतील त्यांच्यासमोर रिसर्च मांडला जाईल. हा क्रांतिकारक निर्णय महाराष्ट्रात सुरू होईल. मोदींना दिलेल्या पत्राबाबत ते म्हणाले मल्हारराव होळकर महदजी शिंदे यांच्या पुतळ्याबद्दल स्थानिक नेतृत्वाने आग्रह केला होता म्हणून मी पत्र दिले.