Pune District : इंदापुरात इच्छुकांच्या आशेवर फिरले पाणी

तालुक्यातील 96 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
इंदापूर – इंदापूर तालुक्यातील 96 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे फेर आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. 11) काढण्यात आली. यामुळे अनेक गावांतील राजकीय समीकरणे पुन्हा बदलली असल्याने अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले असल्याने कहीं खुशी कहीं गम असे वातावरण निर्माण झाले आहे.
इयत्ता दुसरीतील संस्कृती अजय गायकवाड आणि शिवांश विजय गायकवाड या सात वर्षीय चिमुकल्यांनी आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढल्या. याप्रसंगी तहसीलदार जीवन बनसोडे, निवडणूक नायब तहसीलदार विजय घुगे, निवासी नायब तहसीलदार स्वाती राऊत, अविनाश डोईफोडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, महसूल सहायक दीपक पवार, राहुल पारेकर उपस्थित होते. ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण दि. 23 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आले होते. मात्र, ते आरक्षण रद्द करुन नव्याने आरक्षण प्रक्रिया राबविण्यात आली.
जाहीर आरक्षण
अनुसूचित जाती (महिला) : जाधववाडी, डाळज नं.3 करेवाडी, तरंगवाडी, लासूर्णे, वालचंदनगर, कचरवाडी ( नि.के ), काटी
अनुसूचित जमाती महिला : तक्रारवाडी.
अनुसूचित जाती : गलांडवाडी नंबर दोन, कचरवाडी (बावडा), बळपुडी, दगडवाडी, बावडा, अजोती, झगडेवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : गलांडवाडी नं.1, जंक्शन, हिंगणगाव, माळवाडी, रेडा, शेळगाव, थोरातवाडी, निरवांगी, बेलवाडी, सराफवाडी, कळस, शिंदेवाडी, बिजवडी, डिकसळ.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : कडबनवाडी, जांब, रणमोडवाडी, चांडगाव, वरकुटे खुर्द, वरकुटे बुद्रुक, भादलवाडी, भावडी, घोरपडवाडी, लाकडी, अकोले, पिंपरी बुद्रुक, हगारवाडी.
सर्वसाधारण (महिला) : निमगाव केतकी, भिगवण, लोणी देवकर, पळसदेव, अंथुर्णे, आनंदनगर, सणसर, पोंदवडी, शेटफळगढे, तावशी, चिखली, निमसाखर, टणू, व्याहळी, कुरवली, कुंभारगाव, मानकरवाडी, चाकाटी, जाचकवस्ती, पिंपळे, शहा, पिंपरी खुर्द, सरडेवाडी, पडस्थळ, पीठेवाडी, गोतोंडी, म्हसोबाचीवाडी.
सर्वसाधारण : निरगुडे, गिरवी, कळंब,नरसिंहपुर, डाळज नं.1,डाळज नंबर 2, कळाशी, गोंदी /ओझरे, भोडणी, बाभुळगाव, सपकळवाडी, रेडणी, भांडगाव,बोरी, सराटी, न्हावी,निंबोडी, लाखेवाडी, मदनवाडी, काझड, भरणेवाडी, कौठळी, गांजेवळण, वकीलवस्ती, रुई, पिटकेश्वर.
20 गावांच्या सरपंचपदाचे जाहीर केलेले आरक्षण
अनुसूचित जाती : कालठण नं.2, भाटनिमगाव. अनुसूचित जाती (महिला) : उद्धट, तरटगाव. नागरिकांचा मागास प्रवर्ग : गोखळी. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : बोराटवाडी, अगोती नं.2 अवसरी. सर्वसाधारण (महिला) : खोरोची, पवारवाडी, शिरसटवाडी, कांदलगाव, निरनिमगाव, लुमेवाडी.सर्वसाधारण : कालठण नं.1, पंधारवाडी, अगोती नं.1, वडापुरी, शेटफळ हवेली, सुरवड.





