पुणे जिल्हा : तळेगावात रवींद्र काळे यांचा सन्मान ; जिल्हा नियोजन समितीवर निवड

तळेगाव ढमढेरे – शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शिफारशीने नुकतीच पुणे जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली आहे. नवनियुक्त जिल्हा नियोजन समिती सदस्य काळे यांचा शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व तळेगाव ढमढेरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांच्या वतीने तळेगाव ढमढेरे येथे कृषी उत्पन्न उपबाजार समितीत सत्कार सोहळा पार पडला.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी कट्टीबद्ध असून तालुक्यात जिल्हा नियोजन समितीतून भरघोस निधी कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले.
बाजार समितीच्या आवारात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलाध्यक्षा माजी सभापती आरती भुजबळ,
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरचिटणीस यशवंत ढमढेरे, शिरूर तालुका खजिनदार गणेशराव कापरे, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश भुजबळ, उपाध्यक्ष योगेश ढमढेरे, सुनील ढमढेरे, सुनील भुजबळ, महिला उपाध्यक्षा उल्का नरके, सरचिटणीस सुवर्णा भुजबळ, शोभा शितोळे, राष्ट्रवादी युवतीच्या सरचिटणीस प्रियंका ढमढेरे,
सोनाली मायने, गाव शाखा उपाध्यक्ष पल्लवी खामकर, नीलम नरके, निकिता नरके, युवा उद्योजक अमोल कापरे, अर्जुन तोडकर, राजेंद्र ढमढेरे, प्रकाश कापरे, तुकाराम गायकवाड, लक्ष्मण नरके, निवृत्ती जकाते, अमोल वर्पे, राजेंद्र केदारी, संतोष भुजबळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन युवा उद्योजक दुर्गेश भुजबळ व शिरूर तालुका खजिनदार गणेश कापरे यांनी केले.





